दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा :दि.१. श्री संत सावता माळी भवन नांदुरा येथे नांदुरा तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून नांदुरा तालुका प्रमुख संतोष डिवरे, शहर प्रमुख लाला इंगळे, उपतालुका प्रमुख गजानन करांगळे, सुभाष गवळी, रवींद्र इटखेडे, राजेश काटे, राजू पालकर, गणेश ताठे, संजय गुजर, रामा तांदूळकर, सौ. गंगाबाई वक टे, आदी. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी पक्ष संघटन व पक्ष बांधणी आणि येणाऱ्या निवडणुकीत कसे यश संपादन करता येईल व पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याबाबत सखोल मार्गदर्शन केले.सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात केलेल्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देऊन ती माहिती कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचून जनजागृती करावी असे सांगितले. यावेळी तालुका प्रमुख संतोष डिवरे, शहर प्रमुख लाला भाऊ इंगळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.आढावा बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कामावर व पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. या आढावा बैठकीला तालुक्यातील शाखाप्रमुख व बूथ प्रमुख व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा शिवसेना कार्यकर्तेॲड. नंदकिशोर खोंदले यांनी केले