दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सोलापूर-संभाजी गोसावी
सोलापूर जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त मा.हरीश बैजल हे पोलीस आयुक्त पदावरुन मंगळवारी सेवानिवृत्त झाले. सामाजिक भान जपणारा व अन्यायाविरुद्ध लढणारा अधिकारी म्हणून पोलीस विभागांत त्यांचे नाव अनेक वर्षे चर्चेत राहिल राजकीय आणि प्रशासकीय वरिष्ठांचे चुकीचे आदेश त्यांनी नेहमीच झुगारले बेकायदेशीर बदली व डावलयाप्रकरणी यंत्रणेविरुद्ध न्यायालयीन लढा दिला व जिंकला.२९ वर्षाच्या त्यांनी १६ वेळा बदल्यांना सामोरे जावे लागले. त्यांनी अकोला यवतमाळ ,औरंगाबाद मुंबई, नाशिक ,सोलापूर या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. मुंबई वाहतूक उपायुक्त असताना हेल्मेट सीटबेल्ट सक्ती करीत नशेत वाहन चालविणांया विरुद्ध गुन्हे दाखल करुन अपघातावर नियंत्रण मिळविले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागांतील रेकॉर्ड ब्रेक सापडल्यामुळे त्यांना बदलणे हाच सोयीचा पर्याय सरकारपुढे राहिला अन्न ,औषध प्रशासन आता असताना इफेन्ड्रीन जप्तीची मोठी कारवाई त्यांनी केली. सायबर महाराष्ट्रांत समाज माध्यमांचे ५ लाखापेक्षा जास्त बनावट अकाउंटचे प्रकरण उघडकीस आणले. सेवेत संघर्ष केला असला तरीही सामाजिक कामांचे समाधान घेऊन त्यांची निवृत्ती झाली आहे. मंगळवारी दिवसभर पोलिस आयुक्त हरीश बैजल साहेबांना सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी समक्ष व सोशल मीडियावरुन साहेबांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला. सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी पोलीस आयुक्त माननीय. हरीश बैजल साहेबांचे सोशल मीडियावरुन अभिनंदन व त्यांना सातारा जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या