दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनिधी-संभाजी गोसावी
निम्मे आयुष्य शासकीय सेवेत घालवल्यानंतर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी अनेक जण हळवे होतात. आता आपण पुन्हा या सेवेत आयुष्यांत कधीच परत येणार नाही ही मनात असलेली सल लाचलुचपत विभागांचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी वेगळ्या शैलीत मांडली. आम्ही जातो आमच्या गावी अशी सोशल मीडियावरून पोस्ट करुन त्यांनी कार्यालयांतील कर्मचारी यांचा निरोप घेतला. ३१ मे हा अनेकांचं सेवानिवृत्तीचे दिवस आपल्या कार्यालयांत छोटासा कार्यक्रम आयोजित करून शासकीय कर्मचाऱ्यांना निरोप दिला जातो त्यांच्या कामाप्रती आदर व्यक्त करुन दीर्घायुष्यासांठी सहकाऱ्यांकडूंन शुभेच्छा दिल्या जातात असा कार्यक्रम लाचलुचपत कार्यालयांत आयोजित करण्यांत आला. अनेक लाचखोरांना धडकी भरविणारे पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के ३१मे ला सेवानिंवृत्त झाले तत्पूर्वी आदल्या दिवशी त्यांनी सोशल मीडियावरुन भावनिक पोस्ट केली आम्ही जातो आमच्या गावी ही पोस्ट पाहून अनेक जण गहिवरले. तुम्ही जरी निवृत्त झाला असला तरी तुम्ही केलेले काम आमच्या कायम स्मरणांत राहील अशी भावनिक साद घालून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान मंगळवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी पुरीगोसावी हे त्यांच्या नेहमीच परिचत होते. साहेबांना निरोप देताना पुरीगोसावी त्यांचे डोळे भरून आले. साहेब तुमची आठवण ही कायम सातारकरांना नक्कीच राहणार , साहेब अजून पण तुम्ही सातारकर यांच्या सेवेत आहांत हे मात्र तुम्ही विसरून जाऊ नका अशा शब्दांत पुरीगोसावी यांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या.