दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड-शहरातील दोन तरुणांचा पालीच्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना सोमवारी दि. 18 सायंकाळच्या सुमारास घडली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. ओमकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिव संतोष पिंगळे (वय 16 दोघे राहणार शिंदेनगर ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोघे पालीच्या तळ्यावर गेले होते. त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. याची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि, संतोष साबळे यांना मिळतात त्यांनी कर्मचारी पी. टी. चव्हाण, आनंद मस्के यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचे मृतदेह तलावाच्या सांडव्या जवळ आढळून आले.