दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या सार्वगिन विकासा बरोबरच जनतेच्या सुख-दुःखात धावुन जाणारे मदत करणारे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक प्र. संभाजी पाटील चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
लोहा शहरांचे प्रभाग क्रमांक २ चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नगरसेवक प्र. संभाजी पाटील चव्हाण यांना त्यांचे वडील लोहा नगरीचे प्रथम सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष कै. यशवंतराव चव्हाण यांचा राजकिय व सामाजिक वारसा असुन कै. यशवंतराव चव्हाण यांनी लोहा शहरांच्या विकासाचा पाया रोवला खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मदत केली तसेच समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांचें कामे केली तीच परंपरा नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांनी जपली असुन कै . यशवंतराव चव्हाण यांना प्रेरणास्थान मानुन राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन माजी आमदार रोहिदास चव्हाण यांना गुरू मानून २०१८ च्या लोहा न.पा. च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोहा शहरासहीत चव्हाण गल्ली, शेटे गल्ली ,कलाल पेठ, शिवकल्याण नगर आदी भाग येत असलेल्या प्रभाग क्रमांक २ मधून निवडणूक लढवून जनतेच्या आशिर्वादाने पहिल्याच प्रयत्नात संभाजी पाटील चव्हाण यांच्या पत्नी सौ. वर्षाताई संभाजी चव्हाण या निवडूण आल्या .
नगरसेविका सौ. वर्षाताई संभाजी चव्हाण यांना प्रभागाच्या विकास कामांसाठी संभाजी पाटील चव्हाण हे नेहमी मदत करतात.
नगरसेविका सौ. वर्षाताई यांचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला.
२०२०-२१ मध्ये माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी पाटील चव्हाण यांनी पुढाकार घेऊन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोधपणे होण्यास पुढाकार घेतला नाना पाटील चव्हाण हे सभापती झाले तर रामकिशन पारेकर हे उपसभापती झाले तर संभाजी पाटील चव्हाण हे संचालक झाले.
तसेच नगरसेवक प्र.संभाजी पाटील चव्हाण यांनी प्रभागाच्या विकासाचा नियोजित आराखडा तयार करून त्यांचे मार्गदर्शक माजी आमदार रोहिदास चव्हाण यांचे मार्गदर्शन घेऊन पक्षीय मतभेद बाजूला ठेवून लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी,व सर्व सन्माननीय सभागृह यांच्याशी समन्वय साधून प्रभाग क्रमांक २ मध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सौर ऊर्जाची लाईट, पिण्याच्या पाण्यासाठी अनेक बोअर पाडले दलित स्मशान भूमीचे रखडलेले काम पाठपुरावा करून पुर्ण केले. तसेच २०२० साली लोहा शहरासहीत तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे लोहा शहरा सहित तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी संभाजी पाटील चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक २ मध्ये स्व खर्चाने नागरिकांना पाणी पुरवठा केला.
तसेच हे सार्वजनिक कामाबरोबरच कोरोना गोरगरीब नागरिकांना अन्न धान्य वाटप केले, मास्क वाटप केले अनेक वयोवृद्ध महिला पुरुषांना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजनेचे अनुदान मंजूर केले पंतप्रधान स्व निधी अंतर्गत अनेक गोरगरीब व्यापाऱ्यांना १०-१० बिनव्याजी कर्ज मिळवून दिले.
तसेच प्रभागातील नागरिकांना कुणाला दवाखान्यासाठी , कुणाच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे असे अनेक विधायक कार्य नगरसेवक प्र. म्हणून संभाजी पाटील चव्हाण हे नियमित करीत आहेत .
तसेच नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर ,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महामानवाच्या विचारांचा प्रभाव आहे. यंदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला लोहा शहरात प्रशासनाने परवानगी दिली नसताना सुद्धा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पं.स. सदस्य नवनाथ ( बापू) रोहिदास चव्हाण आदी शिवप्रेमी युवक, नागरिक यांची मोट बांधून लोहा शहरात मोठ्या थाटामाटात हर्षोल्लासात डिजे करमाळ्याचा बॅड पथक लावून छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करून भव्य मिरवणूक काढण्यास पुढाकार घेतला पोलीस केसेस न डगमगता अंगावर घेतली .
नगरसेवक प्र. संभाजी पाटील चव्हाण हे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक आदी क्षेत्रात त्यांनी आपला उद्योग व्यवसाय सांभाळून ठसा उमटविला आहे.
नगरसेवक प्र.संभाजी पाटील चव्हाण यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २ मध्ये मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे झाली असून त्यांची मजबूत पकड प्रभाग क्रमांक २वर आहे नुकताच पारडी येथील १९९२ च्या वर्गमित्राचा स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम त्यांच्या पुढाकारातून झाला त्यावेळी एक शिक्षकांनी त्यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य पाहून आनंदित होऊन ते पुढे चालून भविष्यात लोहा मतदार संघाचे आमदार होवो असा आशिर्वाद दिला.
आज या लाडक्या युवा नेत्यांचा नगरसेवक प्र.चा वाढदिवस असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.