दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कलंबर सर्कल -हनुमंत श्रीरामे
हाडोळी: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, भारतातील मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या ,ज्या मनगटात बळ, बुद्धी, आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्या, अन्यायाला कडाडून विरोध करून स्वतः स्त्री असून सुद्धा हातात तलवार घेऊन शत्रूशी सामना करून अंधारलेल्या वाटेत प्रकाशाचा मार्ग दाखविणाऱ्या, स्त्रियांना स्वकर्तुत्वाची जाणीव करून देणाऱ्या, अखंड समाजाच्या प्रेरणामुर्ती, त्यागमुर्ती, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात हाडोळी जहागीर येथे साजरी करण्यात आली.सकाळी 9 वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून ध्वजारोहण करण्यात आला तसेच यशवंतराव होळकर आणि संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तसेच श्री संत बाळुमामा यांची पूजा विधी करण्यात आली.नंतर मारुती निवृत्ती श्रीरामे यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.या जयंतीला गावातील सर्व जाती धर्मातील समाज बांधव उपस्थित होते.हि जयंती श्यामसुंदर भाऊ श्रीरामे, पुंडलिक दादा श्रीरामे,अंगद सोडगीर, कामाजी श्रीरामे,योगेश श्रीरामे, मारुती श्रीरामे, आत्माराम पाटील,नागनाथ श्रीरामे, संग्राम श्रीरामे,विठ्ठल श्रीरामे,पांडुरंग श्रीरामे, शिवकुमार श्रीरामे,लहू श्रीरामे, अंगद श्रीरामे,ज्ञानोबा कोकरे, बालाजी श्रीरामे व समस्त जय मल्हार सेना हाडोळी जागीर यांच्या नेतृत्वाखाली जयंती साजरी करण्यात आली.