दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अरुण भोई
सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक..यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाच एका ‘दबंग आणि जिगरबाज’अधिकाऱ्याच्या निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला. निमित्त होते पोलीस सहाय्यक निरीक्षकपदी बढतीवर सासवडला बदली झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस सहअधीक्षक शशिकांत वाघमारे यांचा रविवार(दि.२९ ) झालेला निरोप समारंभ…
गेली अनेक वर्षे शशिकांत वाघमारे,यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबरच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते. शशिकांत वाघमारे यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही जिल्ह्यातून आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी वाघमारे यांच्या कुटुंबातील सत्कार केला. यावेळी वाघमारे यांच्या मुलीने आपल्या वरती आपल्या आई-वडिलांचे कसे संस्कार आहेत या वरती मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित असलेले सर्वांना भावनिक केले त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा बुकेच्यां वर्षाव झाला. याप्रसंगी अनेक अधिकारी भावुक झाले होते.यावेळी वाघमारे यांचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप,उपनिरीक्षक विनय झिझुंर्के, प्रसिद्ध वकील विजय भालेराव,माजी नगराध्यक्ष प्रमोद जगताप,पुणे जिल्हा नाभिक अध्यक्ष निलेश पांडे, यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी राजेगाव या परिसरातील त्यांचा मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी सासवड येथे उपस्थित होता यावेळी राजेगावातील मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी सासवड मधील मित्रपरिवार ,पोलीस मित्र परिवार,समस्त वाघमारे परिवार उपस्थित होता