
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:नायगाव तालुक्याचे भुमिपूत्र बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा ५५ दिवसानंतर झाला असून. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आल्यानंतर सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणी आणि दहशत माजवण्यासाठीच हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असले तरी पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये कोणत्या कारणांमुळे हत्या करण्यात आली याचा उल्लेख नसल्याने बियाणी यांच्या हत्येचा सस्पेन्स कायम आहे.
संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा एसआयटीचे प्रमुख विजय कबाडे, अतिरिक्त पोलीसनांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दि. ५ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या मागावर असलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोटारसायकलवर आलेल्या या दोन मारेकऱ्यांनी बियाणी यांच्या अगदी जवळ येऊन गोळ्या झाडून ही हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. ११९/२०२२ कलम ३०२, ३०७, ३४ भा. द. वि. सहकलम ३ / २५ भा. ह. का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी 55 दिवसांच्या कसून तपासानंतर पोलिसांनी या हत्येच्या छडा लावला आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी होण्याची शक्यता आहे.
सदर गुन्हयाचे तपासात १) इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर वय ३५ वर्ष २) मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे वय २५ वर्ष ३) सतनामसिंघ ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल वय २८ वर्ष ४) हरदिपसिंघ ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंघ बाजवा वय ३५ वर्ष ५) गुरमुखसिंघ ऊर्फ गुरी पि. सेवकसिंघ गिल वय २४ वर्षे ६) करणजितसिंघ पि. रघविरसिंघ साहू वय ३० वर्ष सर्व रा. नांदेड यांना अटक करण्यात आली आहे.नांदेड यांना अटक करण्यात आली आहे. वरील आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर नांदेड पोलीसांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले यात संजय बियाणी यांची हत्या कोणत्या कारणासाठी झाली याचा कुठेही उल्लेख नाही. पाच राज्यात तपास आणि विदेशात पत्रव्यवहार केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले पण सर्वच आरोपी नांदेडचे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी कुणी गोळीबार केला याचा नामोल्लेख नाही, पिस्तूल जप्त करण्यात आली नाही कि हत्येच्या वेळी वापरलेली मोटारसायकल जप्त नाही, या हत्याकांडामागचा मुख्य सुत्रधार कोण या बाबींचा उलगडा झाला नसल्याने संजय बियाणी यांच्या हत्येचा सस्पेंस कायम आहे.