दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी- माधव गोटमवाड
आज दिनांक:-31 मे 2022 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. आर .लोणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर वर तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. प्रथमता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले .
तंबाखू विरोधी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.डि.एल. गुडमेवार सर यांनी केले व डॉ. महेश पोकले ,डॉ. संतोष पदमवार यांनी तंबाखू सोडविण्या विषयी शपथ घेऊन मार्गदर्शन केले. तंबाखू मुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगण्यात आली तंबाखूमुळे कर्करोग होते त्याचे गंभीर दुष्परिणाम शरीरावर होतात असे यावेळी बोलताना डॉ.संतोष पदमवार ,डॉ. महेश पोकले यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. उपस्थित डॉ. लक्ष्मीनारायण पवार,डॉ. निकहत फाटेतिम
यावेळी डॉ.महेश पोकले,डॉ.संतोष पदमवार, डॉ.गुडमेवार डी.एल, डॉ.निकहत फातेमा उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी श्री. ज्ञानेश्वर बगाडे,श्रीमती.पल्लवी सोनकांबळे,प्रशांत कुमठेकर,श्रीमती.आउबाई भुरके,अनिता तेलंगे ,ज्योती तेलंग,सुरेखा मैलारे, सुनिता वाघमारे ,प्रियंका गलांडे, ज्ञानेश्वरी गुट्टे, श्री.दिलीप कांबळे,नरसिंग झोटींगे,सचिन ठाकूर ,राजेंद्र वाघमारे प्रदीपकुमार पांचाळ,भीमाप्पा हंमपल्ले ,युसुफ सय्यद, सुनील सोनकांबळे आदी उपस्थित होते.