दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : सुट्टी मिळवण्यासाठी वरिष्ठांना दिलेली काही भन्नाट कारणं आपण नक्कीच ऐकली असतील. पावसाळा सुरू होतोय, ऊस झाकायला जायचंय, पाहुण्यांचा बस्ता बांधायचाय, बायकोला माहेरी सोडायचय, बायको रूसली, आमचा कुत्रा आजारी आहे, अशा अनेक भन्नाट कारणांनंतर आता आणखी एक नवं कारण समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यातल्या एका हवालदाराचा अर्ज चर्चेत आला आहे.
पुण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने सुट्टी मिळावी यासाठी हटके स्टाईल मध्ये आपल्या वरिष्ठांना पत्र लिहिलं आहे. आपल्या सहकाऱ्याला चिलापी आणि रव मासे घेऊन द्यायचे आहे असं कारण देत एका पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र लिहिलं आहे.
मासे आणायचे कारण देत २ दिवस सुट्ट्या द्या असं अर्जात लिहिलं आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात घडला आहे . या पत्राची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर तो अर्ज सर्वत्र आता व्हायरल होतो आहे. सर्व प्रथम असे अजब प्रकार पुण्यातच घडतात.