दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
वाई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक श्री . बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खांस बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन पसरणी ता. वाई जि. सातारा या गावांमध्ये खाटीक आळी मध्ये अंगात हिरव्या रंगाचा शर्ट व काळया रंगाची पॅंट असलेला गावठी बनावटीचा कट्टा घेवुन एक इसम फिरत असल्यांची माहिती पोलिस निरीक्षक श्री. भरणे यांना मिळताच त्यानंतर श्री . बाळासाहेब भरणे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी व बीट अंमलदार यांना कारवाई करण्यांबाबत सूचना केल्या. मिळालेल्या माहितीवरुन खात्री करुन गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलिस कर्मचारी व बीट अंमलदार यांनी साध्या वेशांत खाजगी वाहनांने पसरणी गावांत जावुन मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन खाटीक आळीमध्ये पसरणी येथे सापळा लावून संशयितांस रंगेहांत पकडले. सदर आरोपीचे नाव. मनोज हनुमंत फरांदे वय ३२ यांस पोलिसी खाक्या दाखवतांच त्याने त्याच्याकडील अंगावरच्या पॅंटीच्या पाठीमागील बाजूंस खोंचून ठेवलेला ५५.०००/ रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र ) मिळून आले सदर आरोपीस वाई पोलीस ठाण्यांत आणून वाई पोलीस स्टेशन कलम ३(१)२५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक करण्यांत आली सदर गुन्ह्यांचा तपास सुधीर वाळुंज पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल मा. अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे , उपविभागीय पोलीस अधिकारी मा. डॉ. शितल जानवे खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखांली पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण विभागांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. विजय शिर्के , सोनाली माने पोलीस नाईक, श्रीनिवास बिराजदार, किरण निंबाळकर आदीं पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.