दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे,पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने समतादूत द्वारा स्थापित स्वयं सहायता युवा गटातील अनुसूचित जातीच्या युवक युवती करिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत- एकदिवसीय उद्योजकता परिचय मेळावा दिनांक : 1 जून बुधवार रोजी पं.स. कार्यालय वसमत ठिकाणी घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा उमाकांत तोटावार, गटविकास अधिकारी, प. स. वसमत, मा तानाजीराव भोसले, गट शिक्षण अधिकारी, मा, सिद्धार्थ गोवंदे, प्रकल्प अधिकारी, बार्टी, मा शंकर पवार, प्रकल्प अधिकारी ,MCED, हिंगोली, मोईन कादरी आदींच्या उपस्थितीत नवं उद्योजकांना विविध संधी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बार्टी चे प्रकल्प अधिकारी यांनी विविध योजनांची माहिती देत अनु. जातीच्या युवकांना उद्योग क्षेत्रातील संधी विषयी सखोल मार्गदर्शन केले.सदरील प्रशिक्षण वसमत ठिकाणी (दिनांक :9 जून ते 8 जुलै ) या एक महिन्याच्या कालावधीत निशुल्क व अनिवासी घेण्यात येणार असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर पवार प्रकल्प अधिकारी (MCED) यांनी केले, सूत्रसंचालन समतादूत रहीम कुरेशी,मिलिंद आळणे यांनी केले. तर शेवटी आभार समतादूत गुरुनाथ गाडेकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे, सुकेश कांबळे, शंकर पोघे,एम, सी, ई,डी,चे सिद्धार्थ थोरात, दिनेश भुजवणे आदींनी परिश्रम घेतले, यावेळी स्वयं सहायता युवा गटातील सदस्य, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.