दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर -महाराष्ट्र शिक्षक पॅनल द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पूरस्कार सन 2022 अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे दिनांक 15 मे 2022 रोजी जळकोट तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घोणशी ता. जळकोट जिल्हा लातूर येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षीका श्रीमती संगीता चिट्टे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सन्मानित केले. या निमित्ताने लातूर जिल्हा महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समिती सदस्य दीपक चामे, चंद्रकांत गोरगिळे, विकी येलमटे, उबेद शेख, श्रीकांत देशपांडे, अशोक पांडे, ज्ञानेश्वर बडगे, रंगनाथ सगर, शांता लोहारे, सुरेश सुडे, बाळासाहेब कांबळे, सुनीता भंडे, संगीता स्वामी, विजय पोतदार, रवी देशमुख आदी जणांचा सत्कार चिट्टे कुंटूबाच्या वतीने सत्कार करण्याचे योजिले. या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून चिट्टे कुटुंबानी आज दिनांक 3/6/2022 रोजी उदगीर येथे श्री ज्ञानेश्वर बडगे व सौ. आशा बडगे उदगीर यांचा स्वग्रही येऊन शाल, श्रीफळ तसेच भर पेहराव देऊन सत्कार करण्यात. या वेळी श्रीमती संगीता चिट्टे यांनी पुणे येथील पुरस्कार सोहळा चे कौतुक करुन आपण दिलेल्या पुरस्काराने माझी उंची वाढवली व आपला पुरस्कार अत्यंत सुंदर व दर्जेदार तसेच शासकीय राज्यस्तरीय पुरस्कार पेक्षा कितीतरी पटीने दर्जेदार असलेल्याचे बोलून दाखवले. शेवटी लातूर जिल्हा महाराष्ट्र शिक्षक पॅनल प्रमुख दीपक चामे चंद्रकांत गोरगिळे, विकी येलमटे, उबेद शेख, श्रीकांत देशपांडे, अशोक पांडे, ज्ञानेश्वर बडगे, रंगनाथ सगर, शांता लोहारे, सुरेश सुडे, बाळासाहेब कांबळे, सुनीता भंडे, संगीता स्वामी, विजय पोतदार, रवी देशमुख आदी जणांचे आभार मानले