दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्टया जाहीर करण्यात आल्या असून त्यापुढील प्रमाणे आहेत. दिनांक ०१/११/२०२१ ते दिनांक २०/११/२०२१ (२० दिवस) दिनांक २१/११/२०२१ रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे दिनांक २२/११/२०२१ पासून जिल्ह्यातील सर्व शाळा पुर्ववत सुरू होतील. टिप :- प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांना सोडून इतर शिक्षकेत्तर कर्मचार्यांना दिर्घ सुट्टया अनुज्ञेय नाहीत. मात्र दिर्घ सुट्टयांच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्टया असतील त्या सुट्टया शिक्षकेत्तर कर्मचार्यांना अनुज्ञेय राहतील. दिर्घ सुट्टया कालावधीमध्ये खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मुख्याध्यापकांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.