दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड :सोयगाव शहरातील जुना बाजार चौक भागातील घराचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून ७० हजाराचे सोने व ३० हजार रोक असा एक लाखाचा ऐवज चोरी केल्याची खळबळ जनक घटना पुढे आली. कुटुंबातील सर्वच सदस्य लग्नासाठी आळंदला (ता. सिल्लोड) गेल्यामुळे युनूस तुराब शहा यांच्या घराला कुलूप लावण्यात आले होते.
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याची दागिने व रोकड लंपास केली. याप्रकरणी रमजान युनूस शह यांनी सोयगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. फिर्यादीनुसार शनिवारी (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी नातेवाइकांच्या घरी लग्न असल्याने आळद येथे घराचे दरवाजाला कुलूप लावून गेले होते. त्यांना त्याचे चुलत भावाने फोन करून घराचा दरवाजा उघडा असून घरामधील लोखंडी कपाटातील कपडे अस्तव्यस्त पडलेले असल्याचे कळवले. फिर्यादीच्या पत्नीने व वडिलांनी दोन लोखंडी कपाटात ठेवलेले १४ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सपोनि सुदाम शिरसाट, ज्ञानेश्वर सरताळे, राजू बरडे, सादिक तडवी, रवी तायडे, सागर गायकवाड, असे करीत आहोत.