दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
गावातील मूख्य कारभार बघणारी संसद म्हणजे ग्रामपंचायत असते आणि त्यातील महत्वाचा धूरा हा सरपंच व ग्रामसेवकावर असतो गावातील विकासकामात त्यांचा सिंहाचा वाटा असतो.समतोल साधत ग्रामपंचायतचा कारभार चालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो परंतु लोहा तालुक्यातील बेरळी खुर्द येथील ग्रामसेवक व सरपंच या सर्व गोष्टीला अपवाद असुन गावचा विकास त्यांच्यामुळे खूंटला आहे.सामान्य फंडात लोखो रूपयांचा घोळ सूद्धा केला आहे गावाच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अशी तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बुध्दे यांनी पंचायत समिती कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
लोहा तालुक्यातील मौजे बेरळी खुर्द येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्ट,मनमानी व गैरकामाच्या चौकशीची मागणी
गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोहा यांच्याकडे दि.२जून २०२२रोजी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बुध्दे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे की
बेरळी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयास सन २०१८ते२०२२पर्यंत बेरळी खु.येथे विविध योजनांची बोगस कामे दाखवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असून १४व१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत किती निधी आला व किती खर्च झाला याची माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागितली असता माहिती मिळत नाही.ग्रामसेवक सामान्य फंडातून परस्पर रक्कम खर्च करतो त्यामुळे गावातील विकासाला अडथडा निर्माण होत आहे.ग्रामसेवक मुख्यालही हजर राहत नाही व दररोज ऑफिसला येत नाही त्यांच्या सहीसाठी स्थानिक नागरिकांना प्रतिक्षेच्या दारात उभे राहावे लागते. कार्यालयात २ ते ३ तासापेक्षा जास्त वेळ हजर राहात नाही ग्रामपंचायत बाबतची कुठलीही शासकीय खरेदी आजपर्यंत विश्वासात न घेता गावकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून ते आजपर्यंतच्या कँशबूक ,व्हाऊचर ,फाईल ,बिल बुक मागणी करुनही त्यांना दाखवित नाहीत.
आजपर्यंत झालेल्या सि.सि.रस्ता, स्मशानभूमीची कामे,दलित वस्त्यांमध्ये रस्ते, घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.व इतर विविध योजनांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सरपंच व ग्रामसेवक यांनी केला आहे . भ्रष्टाचार उघडकीस येवू नये म्हणून ग्रामसेवक रेकॉर्ड सुद्धा दाखवित नाही.सरपंच व ग्रामसेवक संगनमत करून शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात घोळ केला आहे.त्यांचा गैरकामाची चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.या निवेदनाच्या
प्रति ग्रांमविकास मंत्री महाराष्ट्र राज्य,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड,तहसिलदार लोहा यांना दिल्या आहेत.