दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरात गुणवत्तेच्या बाबतीत पहिल्या पाच क्रमांकात असलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड ची वर्णी लागते. यात कॉलेजनी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल क्रमांक पटकावला असून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2022 चा निकाल दिनांक आठ जून दोन हजार बावीस रोजी घोषित करण्यात आला कोव्हिड- 19 च्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या या निकालात श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड च्या विज्ञान शाखेचा 100 % तर वाणिज्य शाखेचा 100 % आणि कला शाखेचा 90 % निकाल लागला असून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुणवत्तेचा कळस गाठला आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक तथा संचालक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार तथा आमदार भाई डॉ.केशवराव धोंडगे , संस्था सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे , संस्था अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम केशवराव धोंडगे , संस्था सचिव एडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे , अनुक्रमे शालेय समिती सदस्य प्रा.वैजनाथराव कुरुडे , सुर्यकांत कावळे ,एम.पी.कुरुडे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधिर भाऊ गुरुनाथराव कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड ,पर्यवेक्षक प्रा.माधव ब्याळे ,मा.सदानंद नळगे ,शिवराज पवळे , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.मुरलीधर घोरबांड ,कौठा इंचार्ज प्रा.सय्यद जे.आय. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.स्वाती कान्हेगावकर , ज्येष्ठ प्रा वसंत राठोड , व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व स्टाफ सह माध्यमिक व प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकाचे सुद्धा सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .