दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करंजे परिसरांत एका घरफोडी चोरी करण्यांचा प्रयत्न करीत असल्यांची तक्रार शाहूपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरुन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना सदर गुन्हा उघडकीस आणेबाबत सूचना केल्या असता त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी तपासकामी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत असता फुटेच मध्ये तीन संशयित दिसून आले सदर फुटेजच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयित इसमांचा शोध घेण्यांस सुरुवात करीत असतानाच गोपनीय बातमीदरामार्फत फुटेजमध्ये कैद झालेले संशयित इसम हे आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये राहणारे असून ते आकाशवाणीच्या झोपडपट्टीच्या पाठीमागील ओढ्यांच्या कडेला बसले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत असता संशयित इसम पळून जावु लागले त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत त्यापैकी एक इसमांस पकडण्यांत पोलिसांना यश आले तसेच या ठिकाणी त्यांची मोटरसायकल मिळून आली पोलिसांनी ती ताब्यांत घेवुन ताब्यांत घेतलेल्या संशयित इसमांकडे गुन्हे बाबत विचारपूस केली असता परंतु त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याच्या साथीदारांची माहिती पोलिसांना देऊन पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही ताब्यांत घेण्यांत पोलिसांना यश आले.अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोन सराईत आरोपीना जेरबंद केले तसेच त्यांच्याकडूंन गुन्हेकामी वापरण्यांत आलेली मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली सदर गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस हवलदार अतुला तावरे करीत असुन सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल मा. अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पतंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव पोलीस कॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश अशोक फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार ,ओमकार यादव ,स्वप्नील सावंत आदीं पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला