दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भेट घेतली. वर्षा निवासस्थानी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार दाखल झाले. यानंतर अबू आझमींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर अबू आझमी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
अबू आझमी यांनी म्हटलं, आज मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्यासमोर मागण्यांचा पाढा वाचला. माझ्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.