दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
पालघर जिल्हा.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांनी महाराष्ट्र राज्या च्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व वित्त मंत्री अजित दादा यांच्याकडे बऱ्याच वर्षा पासून कनिष्ठ महाविदयालयातील शिक्षक वेतन शालार्थ आय डी मुळे प्रलंबीत असलेले 20 टक्के वेतन अनुदान प्रश्न सोडवण्याची मागणी करून दिवाळी पूर्वी अश्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश वा सूचना संबधीत अधिकारी यांना देऊन या शिक्षक व कर्मचाऱ्या वरील अन्याय दूर करावा. त्याच प्रमाणे वित्तमंत्री मा. अजित दादा शी चर्चा करून अश्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वेतनाचा प्रश्न कायमचा सोडवून जास्तीत जास्त निधी मिळवावा जेणे करून अश्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना न्याय मिळेल. तसेच काही तांत्रिक कारणा मुळे शिक्षकांची शालार्थ आयडी नोंद न केल्या मुळे,तसेच स्क्रूटिनी कमिटी खूपच धीम्या गतीने काम करत आहे.(ही प्रकीया जलद होणे गरजेचे आहे.) त्या मुळे शिक्षकांना वेतन मिळत नाही,तसेच अघोषित शिक्षक प्रश्न,ऑनलाईन वेतनवाढ पोस्ट क्रिएट न होणे, दिवाळी पूर्वी वेतन करणे अश्या मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री वर्षा ताई, वित्त मंत्री अजित दादा, अप्पर सचिव शिक्षण, वित्त सचिव ,शिक्षण आयुक्त यांना दिले आहे अशी माहिती
महाराष्ट्र स्टेट फेडरेशन ऑफ ज्यू. कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन चे पालघर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे यांनी दिली .