दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी– संभाजी गोसावी .
पुणे आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे. गुंजाळवाडी येथे दिनांक २९/०५/२०२२ रोजी दुपारच्या सुमारास नामे (शांताबाई बबन परवडे रा. पळसुर ता.पारनेर जि. अह.नगर ) या एका अनोळखी इसमांने गुंजाळवाडी येथे नगर कल्याण हायवेवर फिर्यादी उभ्या असताना त्यांना धक्का देवुन त्यांच्या गळ्यांतील भा.द.वि. कलम ३९२ प्रमाणे जबरी चोरी करून पळून गेलेल्या बाबत आळेफाटा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.सदर गुन्हा दाखल होताच आळेफाटाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर यांनी तपासणी पथक तयार करुन आळेफाटा,राजुरी गुंजाळवाडी, बेहे या भागात फिरुन सी.सी.टीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे यातील अनोळखी इसमांस निघोज येथील असल्यांचे तपासांत निष्पन्न झाले असून तपास पथकांच्या पोलिसांनी निघोज येथे जावुन यातील संशयित इसम ( प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे व २६ रा. निघोज ता.पारनेर जि. अह.नगर) यांस पोलिसांनी ताब्यांत घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस करुन व पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी अटक केली सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोन्यांचा मुद्देमाल त्याच्याकडूंन जप्त करण्यांत आला याच्यावर २०२१ मध्ये तोफखाना पोलीस ठाण्यांत चोरीबाबत गुन्हा दाखल असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले त्याच्याकडे तपास केला असता त्याचे साथीदार (ज्ञानेश्वर रंगन्नाथ बिबवे वय २२ व गणेश पक्कड कारखिले वय २३ दोन्ही रा.निघोज ता.पारनेर जि.अह.नगर मूळ.उत्तरप्रदेश) यांच्या मदतीने चोरी केल्यांचे निष्पन्न झाले तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यांत घेऊन अटक करण्यांत आली. सदरची कारवाई मा. अभिनवजी देशमुख साहेब,मा.अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, महिला पोलीस उपनिरीक्षक रागीणी कराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डंबरे, विनोद गायकवाड, भिमा लोंढे ,प्रकाश जठार, पंकज पारखे, संजय शिंगाडे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.