
दैनिक चालु वार्ता
धुळे जिल्हा प्रतिनिधि
सोपान देसले
धुळे
दि. २०-१०-२०२१धुळे शहराचा कचरा प्रश्न पेटलेला असून कचरा सद्यस्थितीमध्ये उचलला जात नसून धुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असून डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी धुळेकर नागरिक त्रस्त आहेत. या आजारांनी धुळे शहरातील ४ ते ५ नागरिकांचा बळी गेला असून आजच्या परिस्थितीमध्ये कचरा संकलन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कचरा ठेका देणे हि धोरणात्मक बाब असल्याने कचरा ठेकेदारा समवेत नवीन करारनामा करून कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात यावा जेणेकरून शहरातील नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबून जनेतची सोय होणार आहे.धुळेकर जनतेचा आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेवून धुळे शहराचे आमदार यांनी आज दि.२० ऑक्टोंबर रोजी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेवून धुळे महानगरपालिका कचरा संकलन करणा-या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या विनंतीला मान देऊन नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश दिले असून स्वयंभू कंपनी लवकरच काम सुरू करणार आहे.