दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी :- महेंद्र ढिवरे
मा.उमेश बोरसे साहेब स्वता अभ्यासु,कष्टाळु,मनमिळावु ऋत्तीचे असुन चांगले मार्गदर्शकही आहेत.
या सद् विचाराने दि.२०/१०/२०२१ रोजी रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मीक ऋषी जयंती निमित्त आर.सी.पटेल मराठी माध्यमिक विद्यालय बभळाज येथे इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना २१३ नग वही पेन वाटप करुन शिक्षणाकडे ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.कैलास कोळी यांनी केले. मा.बोरसे साहेबांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागले , त्यामुळे त्यांच्या जागी पोलीस उपनिरीक्षक मा.क्रीष्णा पाटील साहेबांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणुन लोकनियुक्त सरपंच श्री.जगन्नाथ काशिराम महाजन बभळाज ,उपसरपंच श्री.अनिल त्रिभुवन ,तरडी पोलीस पाटील श्री.कमलाकर रायसिंग आणि बभळाज पोलीस पाटील श्री.नितीन जाधव ,उप मुख्याध्यापक श्री.चौधरी सर हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे फुलगुच्छ देऊन कोळी समाज बांधवांच्या वतीने सत्कार करुन वही पेन वाटप करण्यात आले.तसेच मान्यवरांचे भाषणातुन विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी कोळी समाज बांधव आणि शिक्षक व्रुंद यांनी पुर्णतः मेहनत घेतले.