दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी
कधीचाच तू बरसून गेला आज गायब झाला आहे
तप्त उन्हाच्या काहिलीने जीव पिसा झाला आहे
आकाशी तरी दिसाव्यात ना तुझ्या खाणा खूणा रे
निळे शुभ्र आकाश आणि ढग नाही एकही रे
शेत सारे नांगरून झाले बैल झोपा काढत आहे
काय हे नशीब आमुचे पावसाच्या आड आहे
घमघमाट घामाचा अन तनुभर धारा अशा वाहती रे
ये ना आता लवकर कोसळ अंत नको की पाहू रे !
®️ सुनील चिटणीस
१५ जून २०२२
शाळा प्रवेशोत्सव
आता माझी शाळा, सुरू हि झाली
आनंदाने नवीन मुले,शाळेत आली..धृ..
गावामधून काढूनी,प्रभात फेरी
सारेजण जाऊ आपण, त्यांच्या दारी
एक ही मुलगा ,राहणार नाही घरी
हि आपल्या सार्यांची,आहे जबाबदारी
शाळेची घंटा ही झाली,मुले शाळेतआली.1.. शाळा सुरू झाली…
तोरण पताका बांधूनी,शाळेच्या दारी
घोष वाक्यांची करू, जय्यत तयारी
वाजवून ढोल,ताशा, आणि,ती तुतारी
ऐकून गावातील लोक,आली बघा सारी
नवोगत विद्यार्थी,भारावूनी गेली..2..शाळा सुरू झाली…
100% विद्यार्थी आपण,दाखल करून घेऊ
मोफत पाठ्यपुस्तके, त्यांना आपण हो देऊ
प्रेमाने,मायेने,जवळ घेऊन, सांगू नको रे भिऊ
गाणी गोष्टी त्यांच्यासाठी,मजेत हो गाऊ
पहिल्याच दिवशी विद्यार्थी,रंगवूनी गेली..3.. शाळा सुरू झाली..
पहिल्याच दिवशी त्यांचा करू, स्वागत
गुलाब पुष्प,फुगे देवूनी,त्यांच्या हातात
सामील गाव सारा, विद्यार्थ्यांच्या स्वागतात
गोड,गोड पदार्थ देऊ,खायला त्यांच्या हातात
सांगे खरिवले गुरुजी, पुन्हा शाळा सुरू झाली..4.. शाळा सुरू झाली..
शिक्षक
श्री रमेश जनार्दन खरिवले
शाळा,भातसई आदिवासी वाडी
ता.रोहा जि.रायगड