दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा आदिवासी महादेव कोळी समाज उन्नती मंडळाची सभा पळसुंडे येथे पार पडली.आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे साठी आदिवासी विकास विभागात संपर्क साधावा,वधु वर मेळावा आयोजित करण्यात यावा, लग्न,मांडव कार्यक्रमात कपड्याच्या मानपाना वर बंदी घालण्यात यावी, आदिवासी मुलांच्या शिक्षणा व्यवस्था सुधारावी, आदिवासी क्रांतिकारकांच्या जंयती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले,राजे यंशवत राव मुकणे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जव्हार येथे कार्यक्रम आयोजित केला जाईल.
इत्यादी सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेन्द्र जागले गुरुजी होते,सभेस प्रदीप वाघ माजी अध्यक्ष व सभापती यांनी मार्गदर्शन केले, यावेळी दिलीप गाटे माजी जिल्हा परिषद सदस्य,सुरेश भांगरे सर, मिलिंद झोले, संजय वाघ मा.सरपंच, विठ्ठल गोडे, किशोर भवारी, मंगेश दाते, रमेश बोटे,अजय शेळकंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते, वैभव मुकणे यांनी प्रास्ताविक केलेतर सचिव कैलास नवले यांनी आभार मानले.समाजाचे सरचिटणीस प्रदीप वारघडे यांनी हि सभा आयोजना साठी विशेष मेहनत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही केले.