दैनिक चालु वार्ता भोर प्रतिनिधी –जीवन सोनवणे
सारोळे (भोर)-जिल्हा परिषद शाळेचे झाले गोडाऊन भांबवडे येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एक खोली गेली १० महिन्या पासुन शेजारीच सुरु असलेल्या अंगणवाडी इमारतीच्या बांदकाम साहित्य वापरा साठी देण्यात आली होती परंतु तेथे काम सुरु असताना सबंधित ठेकेदार यांना मटेरियल सप्लाय करणारे व्यक्ती यांनी तेथे गेल्या १० महिन्या पासून त्या ठिकाणावर सिमेंट चा साठा करून इतरत्र सुरु असलेल्या त्यांच्या बांधकामावर सप्लाय करत असून त्याची विक्री करीत आहे त्या कडे शाळा प्रशासन लक्ष देत नसून जिल्हा परिषद शाळा हे सिमेट सिमेंट चे गोडाऊन झाले असून खाजगी मटेरियल सप्लाय करणारे यांना कोणाची भीती नसून गावकरी व ग्रामपंचायत भग्याची भूमिका घेत आहेत.
संबंधित मटेरियल सप्लाय करनारे व्यति त्याच ठिकाणावरून सिमेंट विक्री करून आपला व्यवसाय करीत असून या बाबत शाळा प्रशासनाला संबंधित मुख्याध्यापक यांना माहिती अधिकार अर्ज गेल्या नंतर जाग आलेली दिसून आली असता संबंधित विषयावर विचारणा केली असता सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.शाळेचे बांधकाम होऊन व काम होऊन ४ महिने होऊन गेले तरीही त्या व्यक्तीने त्या इमारतीवर कब्जा करून ठेवला आहे.संबंधित खोली मध्ये सीमेंट २०० ते ५०० बॅग असून शाळेच्या इतर मौल्यवान वस्तू सुद्धा आहेत संबंधित वस्तू चे नुकसान झाले तर कोण त्याची भरपाई देणार.सबंधित व्यक्ती शासकीय इमारतीत कोणताही परवाना न घेता व्यवसाय बिनधास्त पने करत असून यावर नक्की वरदहस्त कोणाचा आहे?
माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार संबधित विषयाची माहिती मागविण्याचे काम केले असून येत्या ३० दिवसात शाळा प्रशासन काय उत्तर देईल याकडे आता लक्ष लागले आहे. संबंधित मुख्याध्यापक गायकवाड मैडम यांना विचारणा केली असता त्यांच्या म्हणन्या नुसार संबंधित व्यक्ती व्यवसाय करतो हे आम्हाला आज माहिती झाले आहे.यावरूनच दिसून येते कि संबंधित अधिकाऱ्यांचे शाळा व शाळेच्या इमारतीवर किती लक्ष आहे .केंद्र प्रमुख नाझिरकर यांच्याशी संवाद साधला असता संबंधित खोली ही अंगणवाडी बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी देण्यात आली होती व त्याच्यातून जर त्या गोष्टीचा फायदा घेतला असेल तर संबंधितांवर योग्यती कार्यवाही केली जाईल.
त्या ठिकाणी असनारे अंगणवाडी रजिस्टर सुद्धा धूळ खात पडले असून त्याच्या फक्त आता चींद्या बाकी असलेल्या दिसून आल्या. आता यावर कार्यवाही होणार की पाठीशी घातले जाणार याकडेच आता लक्ष लागले आहे.
शिक्षण अधिकारी सोनवणे यांना संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी विषयाला दुजोरा देत समक्ष पाहणी करून यावर ऊत्तर देऊ असे दै चालू वर्ताच्या प्रतीनिधीला सांगण्यात आले.