दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. राहुल गांधी यांनी ईडीला आज (गुरुवार) पत्र पाठवले आहे. पत्रात त्यांनी शुक्रवारी ईडी चौकशीपासून सुटका मिळावी यासाठी लिहीले आहे.
राहुल गांधी यांची ईडीने गेल्या तीन दिवसांत 30 तास चौकशी झाली आहे. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना एक विनंती केली होती. राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना आज (गुरुवार) चौकशीसाठी येता येणार नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी ईडी चौकशीसाठी हजर न राहण्याबाबत मुभा मागितली होती. ती मागनणी इडीने मान्य केली होती.
राहुल गांधी यांनी आता पत्राद्वारे ईडी अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. काँग्रेस अध्यक्षा आणि आई सोनिया गांधी यांची सध्या तब्येत बरी नाही. सोनिया यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोनिया यांच्या उपचाराचं कारण सांगत राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. १७) चौकशीसाठी हजर राहता येणार नाही, असे पत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी चौकशीसाठी मुभा द्यावी, अशी विनंती राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या पत्राला ईडीकडून नेमकं काय उत्तर दिले जाते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.