दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
लोणंद पाडेगांव ता.फलटण येथील नेवसे वस्तीवर दरोडा टाकण्यांच्या तयारीत असणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पाच जणांच्या टोळीला लोणंद पोलिसांनी गजाआड केले त्यांच्याकडूंन १ लाख 54 हजार असा मुद्देमाल हस्तगत करण्यांत लोणंद पोलिसांना यश मिळाले.( मन्मद अली रंमजान वय 32) मोहम्मद इब्राहिम मोहिद वय३७) फरदिंन बहादर खानवय२०) आलम सरुद खान वय२२)शिवा संत भगवानदा कनेजिया वय३५) सर्व रा. उत्तर प्रदेश सध्या रा. बाळू पाटलाचीवाडी ता. खंडाळा अशी आरोपींची नावे आहेत. लोणंद पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन पाडेगांव ता.फलटण नेवसे वस्ती या ठिकाणी दि.१० जून रोजी गस्त घालत असताना वरील पाच संशयित इसमांच्या हालचाली वरुन गस्तीवर असणार्या लोणंद पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते सर्वजण दरोडा टाकण्यांच्या तयारीत असल्यांचे समोर आले त्यानंतर लोणंद पोलिसांनी या पाचही जणांना लोणंद पोलीस ठाण्यांत आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यांत आली त्यांच्याकडूंन अधिक चौकशी करीत माहिती मिळवली असता त्यांनी यापूर्वी फलटण, बारामती येथील शेतकऱ्यांच्या विहिरीतील तीन विद्युत मोटारी १एचपी पंप, पाण्यांचे वाल असा एकूण सुमारे ५४लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोणंद पोलिसांना यश आले. एवढेच नव्हे तर लोणंद फलटण ग्रामीण वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्यांच्यावर नऊ वेगवेगळे गुन्हे धाकल असल्यांचे समोर आले. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सर्व पोलिस कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.