दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ‘तुम्ही त्या काळी साताऱ्याचे लोकप्रतिनिधी होता, मंत्री होता. त्यावेळी तुमची जबाबदारी का नाही पार पाडली ? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता. या कंपन्या साताऱ्यातून जाण्यास कारणीभूत कोण आहे ? असं असताना खंडणी मागतो असा माझ्यावर आरोप केला जात आहे. मी पक्षाला घरचा आहेर दिला असे बोलले जाते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहात ते ठरवा’, अशा शब्दात उदयनराजे यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.