दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
धुळे जिल्ह्यांतील साखरी तालुक्यांमधून एक धक्कादायक घटना समोर आले असून या घटनेमधून सैराटची पुनरावृत्ती झाली साखरी तालुक्यांचे निजामपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आपल्या २२ वर्षीय बहिणीचे कोणाशीतरी प्रेम संबंध असून ती प्रियकरासोबत पळून जाण्यांचा बेतात असल्यांच्या संशयावरुन भावानेच तिची हत्या केली. आधी भावांने तिला मारहाण केली मग गळफास लावून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर रात्री तिचा अंत विधी उरकून टाकला पोलिसांनी अत्यंत शिताफीने संशयित भावांस गजाआड केले. संदीप रमेश हालोर असे या आरोपी भावांचे नाव आहे. आरोपीला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यांत आली आहे आरोपीने तिला मारहाण करीत फासावर लटकविले संदीप हालोर तिची बहीण पुष्पा हिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्यांचा संशय मनात धरुन तिला मारहाण करीत गळफास लावला तर शेती चा अंत्यविधी आरोपी भावाने रात्रीच उरकून टाकला अशी गोपनीय माहिती निजामपुर पोलिसांना मिळाली. गोपनीय माहितीवरुन पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच आरोपी भावांला गावातच रगेहात पकडले दरम्यान पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्यांने गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली या घटनेमुळे धुळे जिल्ह्यांत एकच खळबळ उडाली