दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे आज शनिवारी 18 जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस पाटील बारहाते यानी माहिती दिली. कीं एका शेतात पुरुष जातींचे अनोळखी मृतदेह पडला आहे शिल्लेगाव पोलिसांना कळवले असता पोलीस निरीक्षक यांनी कर्मचाऱ्यांसाह तात्काळ घटनास्थळी भेट देवुन प्रेताची पहाणी केली,असता सदर अनोळखी इसमास कोणी तरी अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमाने मारुन टाकले असावे असा संशय पोलिसांना आल्याने लगेच तपासाचे चक्रे गतीने फिरवुन सदर मयताची तांत्रीक पध्दतीचा वापर करुन ओळख पटविली असता मयताचे नांव अमन मधुकर निकम वय 23 वर्ष रा.गंगापुर
असे निष्पन्न झाले,सदर इसमास कोणत्या कारणा वरुन कोणी मारुन टाकले असावे याबाबत तपासाचे चक्र
फिरवुन तिन पोलीस पथक तयार करुन वेगवेगळया दिशाने पाठवुन तपास केला, असता सदर गुन्हयातील
संशयीत इसम नामे सागर उर्फ सोनु लक्ष्मण कु-हाडे, वय 25 वर्ष रा.रमाईनगर गंगापुर यास ताब्यात घेवुन
विचारपुस केली असता, त्याने खुन केल्याची कबुली दिली की, सदर मयत नामे अमन निकम याचे आरोपीची
पत्नी सोबत अनैतीक संबंध असल्याचा संशय मनात बाळगुन तो राग मनात धरुन रात्री मित्र दिपक यास
कोपरगांव येथे मोटर सायकलवर सोडण्यास गेले होते, व तेथुन परत येतांना वरखेड शिवारात निर्जनस्थळी नेवुन
मयतास जाब विचारुन त्याचा हातरुमालाने गळा अवळुन जागेवरच जिवे मारले. शेतात प्रेत टाकुन पसार झाला
होता. सदर गुन्हयातील मयताची ओळख पटवुन आरोपीस दोन तासात मोठ्या शिताफीने पकडुन गंभीर गुन्हा
उघडकीस आणला आहे. सदरची कामगीरी मा. श्री मनीष कलवाणीया, पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रा. मा. श्री.
डॉ. पवन बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक,, औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलिसांनी सदरची कामगीरी बजावली आहे