
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- राजमुद्रा सामाजिक संघटना कंधार तालुकाध्यक्ष श्री. किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात कंधार येथे फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राजमुद्रा सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सचिन पाटील इंगोले साहेब, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बळीराम पाटील पवार, संभाजी ब्रिगेड चे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. विनोद पाटील तोरणे सर, राजमुद्रा सामाजिक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष श्री. शहाजी पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील बस्वदे, संभाजी ब्रिगेड चे कंधार तालुकाध्यक्ष श्री. नितीन पाटील कोकाटे, तालुका उपाध्यक्ष श्री. गंगाधर पाटील मोरे, श्री. अनिल येरंडे सह सहकारी मित्र परिवार उपस्थित होते.