
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर / प्रतिनिधी
येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकापूर येथील आदर्श शिक्षक ,बीएलओ पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती प्रभावती लांडगे (वडजे) यांनी लिहिलेल्या ‘जीवनघाट-जो कहा नहीं गया’ या आत्मकथनाचे व ‘गोधडी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि.13/6/022 रोजी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी साहेब यांच्या हस्ते झाले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामेश्वर गोरे,नायब तहसीलदार संतोष गुट्टे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सिंधाळकर , लेखक, समीक्षक डॉ. मारोती कसाब,धमनसुरे साहेब केंद्र प्रमुख, प्रतिभा मुळे केंद्र प्रमुख, ए.टी.बिरादार,स्वामी अंजली मु.अ. डॉ.व्यंकट सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कवयित्री व लेखिका प्रभावती लांडगे /वडजे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नायब तहसीलदार संतोष गुट्टे साहेब तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब ,मा.संतोष गुट्टे साहेब, मा.सिंदाळकर साहेब, मा.धमनसुरे साहेब डॉ. मारोती कसाब जेष्ठ कवी व लेखक यांनी दोन्ही ग्रंथांवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी साहेब दोन्ही ग्रंथांचे कौतुक करुन, ही दोन्ही पुस्तके समाजप्रबोधन करणारी असून, ही प्रेरणादायी पुस्तके अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर अंकुश सिंदगीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी सतीश नाईकवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.शिवराज कस्तूरे, श्री.दगडूजी केंद्रे,श्री.खंडूमल्लके सर,तळेगावकर सर, प्रल्हाद कांबळे, डॉ. बंकट का़ंबळे, वट्टमवार सुमित्रा वसमतकर सविता,राम उडते, देशमुख शोभा, दिनेश लांडगे, रुपेश लांडगे आदीनी प्रयत्न केले.
या सोहळ्याला उदगीर तालुक्यातील साहित्य रसिक, शिक्षक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.