
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- विधानसभा युवक काँग्रेस भूम-परंडा-वाशी च्या वतीने केंद्रात असलेले मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुलजी गांधी यांच्या विरोधात सूडबुद्धीने ईडीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे ,कार्याध्यक्ष अँड सिराज मोगल, विधानसभा अध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद, शहराध्यक्ष मोहम्मद पटेल, महादेव जाधव ,मनोज लष्कर, शहराध्यक्ष राजू साठे, कोहिनूर सय्यद सर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.