
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पुणे: मार्च २०२१-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी चा निकाल महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेचे गगनगिरी महाराज माध्यमिक विद्यालय संतोषनगर कात्रज या विद्यालयाचा निकाल ९६.५९% लागला आहे.त्यामुळे पालकवर्गात आनंद व्यक्त होत आहे.
शाळेमध्ये प्रथम क्रमांक-कु. प्रजापती जगदीश देवीलाल-८८.००% द्वितीय क्रमांक -कु. सकरगे ऋतुजा दिलीप-८७.%८० तृतीय क्रमांक-कु. सुतार लक्ष्मी सुनील-८७.६०% या विद्यार्थ्यांचा आला आहे.त्यामुळे पालकांनी
संस्थेचे संस्थापक रतन माळी ,संस्था अध्यक्षा सौ स्मिता वाघ, संस्था सचिव रवींद्र वाघ ,संस्थाचे पदाधिकारी गगनगिरी प्राथमिक मुख्याध्यापक आजिनाथ चव्हाण माध्यमिक मुख्याध्यापक मंगेश वाडकर ,व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पालकांनी आभार मानले आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मंगेश वाडकर यांनी दिली आहे.