
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी- नामदेव तौर
परतूर :आनंद माध्यमिक शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. श्रावणी राजकुमार तांगडे व हर्षवर्धन संजय तांगडे यांनी 96.40 टक्के घेऊन सर्वप्रथम तर द्वितीय क्रमांक मयुरी तुकाराम बागल 95.60 टक्के व तृतीय क्रमांक पूजा भारत मंडपे 95.40 टक्के घेऊन पटकावला . 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन 18 इतके विद्यार्थी चमकले.80 टक्या पेक्षा जास्त गुण 16 विद्यार्थ्यांनी घेतले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अजित पोरवाल,विष्णू वाघमारे,वर्षा बागल यांनी स्थान भूषविले. याप्रसंगी एकनाथ कदम यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, दहावी च्या मिळालेल्या यशाने हुरळून न जाता विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी च्या प्रवेश परीक्षेची जोरदार तयारी करावी. कारण दहावी नंतर नीट , जेईई या राष्ट्रीय पातळीवर परीक्षा असतात ज्यात 11 ते 16 लाख विद्यार्थी सहभागी होत असतात. मर्यादित जागा व लाखो संख्येने असलेले स्पर्धक अश्या परिस्थितीत स्वतः ला सिद्ध करायचे असते. हे कठीण परिश्रम,प्रबळ मनोबल, योग्य नियोजन या द्वारे साध्य करता येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशीला तौर- कदम यांनी करतांना सांगितले की, होम सेंटर असतांना ही शाळेने कुठल्याही गैरप्रकाराला थारा दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामाणिक पणे मिळविलेल्या गुणांचा विशेष आनंद आहे.
याप्रसंगी विष्णु वाघमारे , दिलीप मगर, अजित पोरवाल व गुणवंत विद्यार्थां यांनाही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विक्रम भांडवलकर यांनी वेळी केले…