
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक येत्या जुलै महिन्यात पार पडत आहे. यासाठी पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १८ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रियेची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली.
देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवार २९ जूनपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत.
मात्र त्याआधीच देशात राजकारण तापलं आहे. भाजपविरहित पक्षांच्या बैठका होत असून विरोधकांच्या उमेदवारीवर चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांच्या नावाना सर्वांचा पाठिंबा आहे. मात्र खुद्द पवारांनी निवडणूक न लढण्याचं स्पष्ट केल्याने समीकरणं आणखी बदलली आहेत. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप देशातील सर्व पक्षांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी फोन करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. देशातील अनेक मोठे नेते राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीबद्दल बोलण्यासाठी उद्धव ठाकरे यांना फोन करत असल्याचं राऊतांनी सांगितलं.