
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर,
विशेष पर्यटन विकास व वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद यांच्या माध्यमातून नव्याने साकारण्यात आलेल्या शिवतीर्थ उद्यानाचे उद्घाटन आमदार डॉ विनय कोरे सावकार यांच्या हस्ते संपन्न झाली त्याचबरोबर पन्हाळा क्लब या नव्याने रिनोवेशन केलेल्या इमारतीचे व बाजीप्रभू चौक येथील वाहनतळ उद्घाटन आमदार कोरे यांच्या हस्ते झाले शिवतीर्थ उद्यान हे पर्यटकांना आकर्षक उद्यान बनली आहे गडावरील थंड हवा हिरवळ विविध फुलांची झाडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी झोपाळे स्टॅच्यू स्वरूपातील वाघ गवा रेडे ,हरीण यांच्या प्रतिमा हे सगळं बघून पर्यटकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे पन्हाळगडावर एकूण चार उद्याने आहेत त्यामध्ये मयूर उद्यान,नेहरू उद्यान ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ,तबक उद्यान ,आणि नव्याने साकारलेली शिवतीर्थ उद्यान असे मिळून एकूण पाच उद्यान पन्हाळगडावर आता पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी उपलब्ध आहेत तर गडावरील नागरिक व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .यावेळी आमदार कोरे बोलले की, ऐतिहासिक ठेवा पुढे नेण्याचे काम भाग्य आपल्याला मिळाले उद्याच्या विकासा ची वाटचाल आपल्या हातून व्हावी, पन्हाळा गडाचे ऐतिहासिक वैभव फार मोठे आहे इथल्या नागरिकांच्या व नगरसेवक मदतीने मला करता आले, तसेच माझी वसुंधरा अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात विभागात आपला पन्हाळगडाचा पहिला क्रमांक आला. पाच हजार झाडे लावण्याचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेला आहे ते लावणे ती जगवणे, पन्हाळगड व पावनखिंड चा इतिहास लोकांना कळावा यासाठी 3D टेक्नॉलॉजी वापरून नगरपालिकेच्या वतीने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला हा इतिहास प्रेरणादायी आहे यासाठी हा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे ,असे आमदार डॉ.विनय कोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
अनेक जनसुराज्य शक्ती पक्षा करिता इच्छुक उमेदवारांची लक्षणीय गर्दी यानिमित्त या उद्घाटन सोहळ्यास पाहव्यास मिळत होती ,
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ रुपाली धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खरगे , विजय पाटील,रवींद्र धडेल, नगरसेवक ,रवींद्र तोरसे ,अवधूत भोसले, चेतन भोसले, नगरसेवक व नगरसेविका आदी मान्यवर व समीर मोघे, प्रकाश गवंडी,नागरिक उपस्थित होते