
दैनिक चालु वार्ता भिगवन प्रतिनिधि- जुबेर शेख
भिगवन :भैरवनाथ विद्यालय भिगवन येथील स्टेशन शाखेच्या मार्च 2002-03 साली इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थी यांचा स्नेह संम्मेलन मेळावा भिगवन स्टेशन येथील शाळेमधे संपन्न झाला.जवळपास 19 वर्षानी झालेल्या या भेटीमधे सर्व मित्रांनी आपापल्या आयुष्यात आलेले अनुभव एकमेका बरोबर वाटून घेतले आणि आयुष्यातील एक दिवस पुन्हा एकदा शालेय जीवन अनुभवले.
यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. सर्व विद्यार्थियांनी एकमेकांना भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना निःसंकोचपणे मदत करण्याचा संकल्प केला. जवळपास 40-45 विद्यार्थी यांनी आपापल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून मेळाव्याला हजेरी लावली.सर्व विद्यार्थी यांनी स्वतः मनोगत व्यक्त करताना आपल्या 10 वि पर्यंत च्या गोड आठवनीना उजाळा दिला काहीच्या डोळ्यात न कळत आनंदअश्रु आले.
या विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करुण करण्यात आली.प्रस्तावना अजित मोरे व उमेश वाघमारे यांनी केली. कार्यक्रमाचे सर्व नियोजन अतुल जाधव,रिनाज मुजावर, स्वाती नागवे, धनंजय पवार, आरिफ शेख, धनंजय मराळे व शिरीष काळे यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षकवृद मुजावर सर, इंगले सर, भोसले सर, कुबेर सर,गावड़े सर ,करपे सर व थोरात शिपाई उपस्थित होते.माजी विद्यार्थी यांनी भैरवनाथ विद्यालय भिगवण स्टेशनच्या शाळे साठी स्व खर्चातून फैब्रिकेशन चे दरवाजा भेट देण्याचे सांगितले . कार्यक्रमाचे आभार संदीप शिंदे यांनी केले.