
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी-आपसिंग पाडवी
धडगांव न्यायालयाच्या आवारात बेवारस मानवी केस दवाखान्यासाठी वापरण्यात आलेले सुई, सलाईन अज्ञाता कडून टाकण्यात आल्याने धडगाव वकील संघाने नाराजी दर्शवित नगर पंचायती कडे तक्रार केली आहे. धडगांव न्यायालयाच्या आवारात वकील संघ कार्यालयाच्या मागे अनोळखी व्यक्तीने एक पोते भरून मानवी कापलेले केस तसेच डॉक्टर / रक्तपेढी वापरलेले सुई, सलाईन फेकलेले आढळले. सदर बाब वकील संघाच्या पदाधिकारी यांना दिसल्याने फेकलेली वस्तू ही हानिकारक आहे व धडगांव नगर पंचायतच्या आरोग्या विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते, त्यामुळे सर्व पदाधिकारी मिळून धडगांव नगर पंचायतीच्या कार्यालयात तोंडी तक्रार केली. त्यानंतर आरोग्य निरीक्षक हे स्वतः येऊन फेकलेल्या बेवारस वस्तूंची पाहणी केली व सार्वजनिक ठिकाणी बेवारस वस्तू फेकल्याबाबत धडगांव शहरातील सर्व नावी दुकानदार व खाजगी रुग्णालय चालवणारे डॉक्टर यांना नोटीस देण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी अँड गोमता पावरा अँड बापू पावरा अँड रमण वसावे अँड पणक्या पावरा अँड छोटू वळवी अँड एस डी पराडके अँड दीपक वळवी अँड अनिल पावरा अँड शंकर वळवी अँड दिनकर पावरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया – जिथे न्यायदानाचे काम पाहिले जाते त्याठिकाणी असा प्रकार निंदनीय असून सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.