
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी
चारित्र्याच्या संशयावरुन शीला दादासो फाळके (वय३० या कूपर कॉलनी सदर बाजार सातारा) या विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केल्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दि.१७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी पतीसह सासू सासरायावर शहर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पतीला ताब्यांत घेतले आहे. पती दादासो गणपत फाळके, अरुणा गणपत फाळके, सासरे गणपत मारुती फाळके, दीर सागर गणपत फळके (सर्व रा.कूपर कॉलनी सदर बाजार सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन शीला हिचे दादासो फाळके यांच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले त्यांचा सुखी समाधानी संसार चालला होता पण लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरु होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता शीला फाळके ही घरांतील बेडरुम मध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली त्यानंतर तिला घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयांत दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर शीला हिच्या नातेवाइकांनी शीलाचा खून झाला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शीलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यांत आले. मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यांत आल्यांमुळे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना समजू शकला नाही. परंतु शीला माहेरी जाते या कारणावरुन सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली तर पती दादासो फाळके यांनी चारित्र्यांच्या संशयावरुन शीलाचा गळा दाबून खून केला अशी तक्रार मोनिका जनार्दन साठे (रा. सदर बाजार सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल केली.सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखांली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.