
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी
दि.१९ जून रोजी शिवसेनेच्या ५६ व्या. वर्धापन दिनानिमित्त अतनूर येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने ५६ वृक्ष झाडांची लागवड करून एक नवीन उपक्रम घेण्यात आला व पर्यावरण संरक्षणाचा नवीन संदेश देण्यात आला.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख तथा युवासेना तालुका सरचिटणीस मुक्तेश्वर येवरे-पाटील, अतनूर पंचायत समिती सर्कल प्रमुख गोविंद बारसुळे, गव्हाण शाखा प्रमुख डी. आर.घोडके, रामेश्वर कारलेवाड, कोंडीबा रेकुळवाड, नितीन भोईनवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.