
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : पुण्यातल्या चंदननगर भागातील एक तरूणी खराडी परिसरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या सहका-यां सोबत चहा प्यायला आली होती. तेवढ्यात एक तरूण तेथे आला आणि तीला हेतुपुरस्सर धक्का दिला. तिने त्याला जाब विचारताच त्याने तीला शिवीगाळ करून दमदाटी केली आणि अंगाला झोंबू लागला. एवढेच नव्हे तर तीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. त्या घाबरलेल्या मुलीने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरूद्ध तक्रार नोंदवली. पोलीसांनी अती वेगाने तपास करीत आरोपीला दहा मिनिटांत जेरबंद केले. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत