
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:अंगावर वीज पडून शेतकरी ठार झाल्याची घटना तालुक्यातील वन्नाळी येथे १८ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास
पेरणीसाठी गेले होते. सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पेरणीचे साहित्य व औषधी झाकून ठेवण्यासाठी विठ्ठल भाले हे गेले असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती
घडली.देगलुर
शहरासह ग्रामीण भागात १८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वन्नाळी येथील तरुण शेतकरी विठ्ठल शंकराव भाले (४१) हे आपल्या लखा येथील शिवारात
यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, व एक भाऊ असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असलेल्या विठ्ठल भाले यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.