दैनिक चालू वार्ता
मोखाडा प्रतिनिधी:-अनंता टोपले
मोखाडा तालुक्यातील बेरीस्ता ग्रामपंचायत क्षेत्रातील 125 लोकसंख्या व 20 घर असणार्या मुकुंद पाडा येथे आज पंचायत समिती सदस्य व माजी सभापती यांनी ग्रामसेवक व पंचायत समिती विस्तार अधिकारी यांना बरोबर घेऊन भेट दिली, त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक समस्या श्री वाघ यांना उत्कृष्ट सांगीतल्या,या पाड्या वर जाण्यासाठी रस्ता व पुल बांधणे गरजेचे आहे, पावसाळ्यात नदीला पूर आला की या जनतेचा संपर्क तुटतो त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्या साठी कसरत करावी लागते, वृद्ध व्यक्ती,महीला, लहान बालकांना शाळेसाठी नदी ओलांडून देण्यासाठी गावातील तरुण मंडळी जीव मुठीत घेऊन नदी पात्र पार करत असतात.
गावात जिल्हा परिषद शाळा काही वर्ष सुरू केली परंतु सध्या ती पण बंद आहे, त्यामुळे 1 ते4 पर्यंत बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे.
रेशनिंग धान्य देखील 12कोष दुर वरुन डोक्यावर घेऊन यावे लागते, पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने ते सुद्धा घेऊन येणे जिकरीचे बनले आहे,.
गावात नळपाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून केली होती पण सध्या ती बंद आहे.गावात नवीन विहीरीची आवश्यकता आहे.
अशा अनेक समस्या यावेळी श्री वाघ यांनी जाणुन घेतल्या व आपण शासन दरबारी हे सर्व विषय शासना समोर मांडणार असल्याचे सांगितले, यावेळी प्रशासक श्री तुषार सुर्यवंशी व ग्रामसेवक यांनी देखील सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून देऊ व येथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.
यावेळी ग्रामस्थांनी श्री प्रदीप वाघ यांचे स्वागत केले व निवडणूक नसताना देखील कुणी तरी आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या अति दुर्गम गावात आले म्हणून गावकऱ्यांचे डोळे पाणावले.