
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: प्रतिनिधी देगलूर येथील गोळवलकर गुरुजी विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मा. शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाशजी चिंतावार, पालक प्रतिनिधी श्री.तिवारी, मुख्याद्यापक दमन देगांवकर,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सौ. सुरशेटवार यांची उपस्थिती होती. सर्व नवगतांचे पाऊल ठसे घेऊन, पुस्तक वाटप, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेच्या दर्शनी भागात रांगोळी, तोरण लावण्यात आले. शाळेच्या पहिल्या उपक्रमात सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.