
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर : देगलूर तालुक्यातील विजेची कृत्रिम टंचाई दुर करावी, ठाकरे सरकारने केलेल्या कर्ज माफी योजनेतील वंचित शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी व कृषी सन्मान योजनेतील वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा या मागणीचे निवेदन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांना शिवसेनेच्या वतीने मुंबई येथे निवेदन देण्यात आले. या बाबतीत अधिक माहिती अशी की , देगलूर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीपूर्वी तयारी करून सोयाबीन, उडीद, तुर मुग आदी पेरणी करीत असुन बाजारात चढ्या दराने बियाणे विक्री करून व कृत्रिम रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना लुटत आहेत त्यामुळे यांची चौकशी करून बियाणे व खत टंचाई दूर करून मुबलक प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, मुख्यमंत्री मंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन सरकार स्थापन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्जमाफी योजनेतील त्रुटींमुळे या मोठ्या संख्येने शेतकरी वंचित आहेत शेतकरी पात्र असुन सुद्धा बॅंकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर माफीची रक्कम जमा केली गेली नाही त्यामुळे यांची चौकशी करून त्वरित पात्र शेतकरयांच्या खात्यावर माफीची रक्कम जमा करावी, P . M . किसान सन्मान निधीतील त्रुटींमुळे हजारो शेतकरी महीना 500 रुपये मदत निधी पासुन वंचित आहेत यांचीही चौकशी करून त्वरित पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन देगलूर तालुका शिवसेनेच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आले यावेळी नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा प्रमुख दत्ताजी कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील उमरी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार , मारोतराव ढोसणीकर, देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजीभाऊ जोशी, गजानन डोनगांवकर आदींची उपस्थिती होती