
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा भारतीय सैन्य दलामध्ये युवकांना भरतीसाठी अग्नीपथ योजना केंद्र शासनाकडूंन सुरु करण्यांत आली असून. या योजनेला देशातील काही राज्यांमध्ये विरोध दर्शविला जात असून काही ठिकाणी हिंसाचाराचे प्रकार घडत आहेत. योजने विरोधांत (टूर ऑफ ड्यूटी आंदोलन/ मोर्चाचे नियोजन करण्यांसाठी सोमवार दिनांक २०/६/२०२२ रोजी समन्वय बैठक आयोजित केली असल्यांचे संदेश प्रसार माध्यमांवर प्रसारित होत असून. तसेच सातारा जिल्ह्यांतील सर्व नागरिक , सैन्यदलामध्ये भरती होण्यांकरिता तयारीत असलेले युवक करिअर अकॅडमीचे मालक/ चालक यांना कळविण्यांत येते की प्रसार माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या मेसेजवर कोणीही विश्वांस ठेवू नये तो मेसेज कोणत्याही ग्रुपवर शेअर करु नये. लोकांच्या भावना भडकावून हिंसाचारांच्या घटना घडतील अशा प्रकारांचे भडकावू मेसेज कोणत्यांही आपल्याकडील ग्रुपवर शेअर करु नयेत अग्नीपथ योजनेच्या विरोधांत भडकावू मेसेज संदेश भाष्य करुन हिंसाचा घडवून आणण्यांचा प्रयत्न करणारी व्यक्ती किंवा ग्रुप ॲडमीन यांच्यासह संबंधित व्यक्तीवर गंभीर स्वरुपांचे गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यांत येणार आहे. त्यामुळे युवकांचे भविष्य धोक्यांत येणार असून त्यांना शासकीय नोकरी मिळण्यांस अडचणी निर्माण होणार आहेत तरी सर्व नागरिकांनी योजनेच्या विरोधांत सोशल मीडियांवर प्रसार करु नये असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी केले आहे