
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
डॉ.नितीन रांधवण सह सर्व नवनिर्वाचीत संचालकांनी घेतली आ.लंके यांची भेट !
भविष्यात आ.लंके यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार सर्व सदस्यांनी दिली ग्वाही !
वनकुटे/पारनेर:-आ.निलेशजी लंके यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघातील सर्वाधीक सेवा सोसायट्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यात आ. लंके यशस्वी झाले आहेत . बहुचर्चित आसलेल्या वनकुटे सेवा सोसायटी ही आ.लंके यांच्या विरोधात गेली असे विरोधकांनी प्रसार माध्यमांवर प्रसारीत केले होते .परंतु त्यात कुठलेही तथ्य नाही सर्व संचालक हे आ . लंके यांच्या विचारांवर प्रेम करणारे आहे . असे यावेळी पॅनल प्रमुख डॉक्टर नितीन रांधवन यांनी सांगितले .
यावेळी निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सदस्य त्यात काशिनाथ बुचडे , अशोक गागरे , मच्छिंद्र खामकर , ज्ञानेश्वर गागरे , मच्छिंद्र पठारे , भानुदास गागरे , पारूबाई वाबळे , विठ्ठल काळनर , कौशिक औटी , भिवा केसकर , सोनबा गोरे , सूर्यभान औटी , गणेश मुसळे , गणपत काळकर , भास्कर शिंदे , बाबाजी गागरे , श्रीकांत डुकरे , चिवा औटी , पवन खामकर , रेवन लोणकर , नसीर शेख ,आप्पा वाबळे , बाळू डुकरे , भाऊसाहेब गागरे , शिराज शेख , सुरेश डुकरे यांच्यासह वनकुटे गावात कार्यरत असणारे अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते .