
दैनिक चालु वार्ता भिगवन प्रतिनिधि : जुबेर शेख
भिगवण: भिगवन चे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात भिगवणकर एंटरटेनमेंट प्रस्तुत “धमाल लक्षा कमाल गंगु “या बेव सिरीजच्या चित्रिकरणास सुभारंभ करण्यात आला.वेबसीरीज चे निर्माता व दिग्दर्शक राहुल राऊत(सुतार) आहेत ग्रामीण भागातील लोकांच्या कला गुणांना वाव देंण्यासाठी या वेबसीरीज चे निर्माण करण्यात येत असल्याचे राहुल राउत यांनी सांगितले, या वेब सीरीज मधे अर्पिता रणदिवे, मंगेश शिरसागर,सविता जाधव, दिव्या जाधव,नागनाथ नलवडे, प्रथमेश जाधव हे ग्रामीण भागातील कलाकार आहेत.
या वेब सीरीज च्या सुभारंभ प्रसंगी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव, ग्रामपंचायत सदस्य तुषार शिरसागर, मा सरपंच संजय रायसोनी,दत्तात्रय धवडे व थोरात उपस्थित होते त्याचबरोबर भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील व पोलीस हवालदार महेश माने साहेब हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम सातपुते यांनी केले व आभार राहुल राऊत (सुतार )यांनी मानले.